बंगळुरू : पालकांचा निष्काळजीपणा! सनरूफचा आनंद घेताना मुलाला ट्रॅफिक बॅरियरची धडक; व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडियावर पालकांच्या निष्काळीपणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गाडीच्या सनरूफचा आनंद घेत असताना एक लहान मुलगा गाडीच्या भरधाव वेगामुळे ट्रॅफिक बॅरियरला जोरात धडकतो.
बंगळुरू : पालकांचा निष्काळजीपणा! सनरूफचा आनंद घेताना मुलाला ट्रॅफिक बॅरियरची धडक; व्हिडिओ व्हायरल
Published on

सोशल मिडियावर पालकांच्या निष्काळीपणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गाडीच्या सनरूफचा आनंद घेत असताना एक लहान मुलगा गाडीच्या भरधाव वेगामुळे ट्रॅफिक बॅरियरला जोरात धडकतो. परंतु, वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. ही घटना बंगळुरू येथील विद्यारण्यपुरामध्ये घडल्याचे समजते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पालकांच्या बेजबाबदारपणा तसेच वाहन चालकाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते, की एका लाल रंगाच्या एसयूव्ही कारच्या सनरूफमधून मुलगा बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेत आहे. गाडी वेगाने जात असताना क्षणांतच मुलगा ट्रॅफिक बॅरियरला जोरात धडकतोय. ही घटना घडूनही कार थांबत नाही, ती पुढे निघून जाते. मुलाला गंभीर दुखापत झाली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हा व्हिडिओ @nammabengaluroo या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. पोस्टमध्ये पालकांना इशारा देण्यात आला आहे की, मुलांना सनरूफमधून बाहेर उभे राहू देणे जीवघेणे ठरू शकते. "स्वस्त मनोरंजनासाठी मुलांच्या सुरक्षिततेशी खेळ करू नका," असा संदेशही यातून देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in