
नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात नितीशकुमार सरकारमधील मंत्री आणि जेडीयू नेते श्रवण कुमार यांच्या ताफ्याचा पाठलाग करून काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ज्यामध्ये मंत्र्यांचा अंगरक्षक जखमी झाला आहे. हिलसा पोलीस स्टेशन परिसरातील मलावा गावात ही घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मंत्री आले होते.
याच दरम्यान, मंत्र्यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला. या लोकांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत ताफ्याचा पाठलाग केला. सध्या गावात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता.