Budget 2026 : निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; क्रीडा साहित्य क्षेत्रासाठी विशेष उपक्रम, 'खेलो इंडिया मिशन' स्थापन होणार

आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने भारत उच्च दर्जाचे व परवडणारे क्रीडा साहित्य तयार करणारा जागतिक केंद्र (Global Hub) बनू शकतो.
Budget 2026 : निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; क्रीडा साहित्य क्षेत्रासाठी विशेष उपक्रम, 'खेलो इंडिया मिशन' स्थापन होणार
Published on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. क्रीडा साहित्य निर्मिती, संशोधन, तंत्रज्ञान आणि नव्या उपक्रमांना चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच,पुढील दहा वर्षांत क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी ‘खेलो इंडिया मिशन’ सुरू करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.

या मिशनच्या माध्यमातून क्रीडाप्रतिभांची शिस्तबद्ध जोपासना करण्यात येणार असून, देशाच्या क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्याचा सरकारचा मानस असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, "आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने भारत उच्च दर्जाचे व परवडणारे क्रीडा साहित्य तयार करणारा जागतिक केंद्र (Global Hub) बनू शकतो. या उपक्रमांतर्गत क्रीडा उपकरणांचे डिझाइन, मटेरियल सायन्स आणि संशोधनाला चालना दिली जाणार आहे."

या निर्णयामुळे स्टार्टअप्स, लघु व मध्यम उद्योग (SMEs) तसेच तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांसाठी नव्या संधी निर्माण होतील. यासोबतच क्रीडा क्षेत्रातून रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि नोकऱ्यांच्या संधी वाढतील, असेही त्यांनी नमूद केले.

"खेलो इंडिया कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात ‘खेलो इंडिया मिशन’ सुरू करण्यात येणार असून, पुढील दहा वर्षांत क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा सरकारचा मानस आहे," असे सीतारामन यांनी सांगितले.

Budget 2026 : निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; क्रीडा साहित्य क्षेत्रासाठी विशेष उपक्रम, 'खेलो इंडिया मिशन' स्थापन होणार
Union Budget 2026 : मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट; नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्र केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, भविष्यात महत्त्वाचा औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्र म्हणून उदयास येणार असल्याचे स्पष्ट होते.

logo
marathi.freepressjournal.in