'त्या' पायलटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव

Captain Smit Machchhar: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानामध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेवेळी अतुलनीय शौर्य दाखवून १७४ प्रवाशांचे जीव वाचवल्याबद्दल भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मच्छार यांची तोंडभरून स्तुती केली आहे.
'त्या' पायलटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव
Published on: 

नवी दिल्ली : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानामध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेवेळी अतुलनीय शौर्य दाखवून १७४ प्रवाशांचे जीव वाचवल्याबद्दल भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मच्छार यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

‘कॅप्टन स्मित मच्छार हे देशाचे खरे ‘नायक’ आहेत. अत्यंत भीषण संकटाच्या क्षणी गंभीर जखमी असतानाही त्यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रवाशांना वाचवण्याचा अटळ निश्चय थक्क करणारा आहे. संपूर्ण देशाला त्यांचा सार्थ अभिमान असून ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहोत,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

‘वैमानिकाची प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी दाखवलेली समयसूचकता अप्रतिम होती, ते खरोखरच एक महान हिरो आहेत,’ असे ट्रम्प यांनी सांगितले. ‘एका भारतीयाने ९/११ होण्यापासून वाचवले. तो सच्चा नायक आहे. आम्ही हल्ल्याची गुप्त माहिती दिली होती. तसेच या हल्ल्याला इराणचा पाठिंबा होता, असेही कळवले होते,’ असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले.

देशाची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांनीही स्मित यांचे कौतुक केले आहे. ‘कॅप्टन स्मित यांच्या शौर्याचा आणि हिंमतीचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा हल्ला झाल्यावर स्मित यांचा जीव धोक्यात होता, तेव्हा कठीण आणि नाजूक काळ होता. त्यावेळी त्यांनी १७४ लोकांचा जीव वाचवला. भारताची हीच ओळख आहे. त्यांच्या शौर्याचा भारताला अभिमान वाटत आहे,’ असे राम मोहन नायडू म्हणाले.

मूळचे मुंबईचे रहिवासी असलेले स्मित मच्छार हे फ्लायदुबई कंपनीत रुजू होण्यापूर्वी भारतातील स्पाइसजेट या विमान कंपनीमध्ये तब्बल ११ वर्षांपेक्षा जास्त काळ वैमानिक म्हणून कार्यरत होते.

विमानातील प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांच्यावर तबूक येथील रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मच्छार यांची प्रकृती आता स्थिर असून दूतावास त्यांच्या कुटुंबाच्या आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

'त्या' पायलटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव
'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

मोदी, ट्रम्प, नेतन्याहू यांच्याकडून स्तुती

केवळ भारतातूनच नव्हे, तर जागतिक स्तरावरील प्रमुख नेत्यांनीही भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही मच्छार यांची स्तुती केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in