'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक

सोशल मीडियामार्फत राजकीय क्षेत्रात धमाल उडवून देणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर मोठी कारवाई झाल्याचा आरोप पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी केला.
'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक
'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक
Published on

नवी दिल्ली : सोशल मीडियामार्फत राजकीय क्षेत्रात धमाल उडवून देणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर मोठी कारवाई झाल्याचा आरोप पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी केला. अनेक अकाऊंट्स ब्लॉक झाल्यानंतर आणि हॅकिंगच्या घटनांनंतर आता पक्षाच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंट्सचा अॅक्सेस आमच्याकडे राहिलेला नाही, असे दिपके यांनी म्हटले आहे. पक्षाच्या वेबसाइटवरही गदा आली आहे असे त्यांनी नमूद केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे त्यांनी दावा केला की, त्यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतात सीजेपीचे मुख्य एक्स अकाऊंट ब्लॉक करण्यात आले होते, ज्यानंतर दिपके यांनी एक नवीन बॅकअप अकाऊंट सुरू केले होते.

आंदोलन सुरू केल्यावर कारवाई

शिक्षण क्षेत्रातील कथित पद्धतशीर अपयश आणि 'नीट-यूजी २०२६'च्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सीजेपीने शुक्रवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ऑनलाइन मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा दिपके यांनी केला होता आणि त्या धमक्यांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते.

'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; NEET प्रश्नी ‘झुरळां’चा पहिला हल्ला

सध्या सीजेपीच्या या नव्या बॅकअप एक्स अकाऊंटला २ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला २.१९ कोटी (२१.९ दशलक्ष) फॉलोअर्स होते. दिपके यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांचे अकाऊंट्स हॅक करण्याचे प्रयत्न होत असून ते या प्रकरणी कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत.

दडपशाही सुरू

कॉकरोच जनता पार्टीवर दडपशाही सुरू आहे. आमचे अधिकृत इन्स्टाग्राम पेज हॅक झाले आहे. माझे वैयक्तिक इन्स्टाग्रामही हॅक केले गेले आहे. द्विटर अकाऊंट आधीच ब्लॉक केले आहे आणि आता आमचे बॅकअप अकाऊंटही काढून टाकण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, "कृपया नोंद घ्या की सध्या आमच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस आमच्याकडे नाही. त्यामुळे यापुढे होणारी कोणतीही पोस्ट ही 'कॉकरोच जनता पार्टी'चे अधिकृत वक्तव्य मानले जाऊ नये." सध्या सीजेपीचे अधिकृत संकेतस्थळही बंद पडले असून ते आता उपलब्ध नाही.

घराबाहेर बंदोबस्त

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांना अमेरिकेतून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in