वायनाड : केरळमधील वायनाड भूस्खलनाची सर्वात पहिली माहिती देणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नीतू जोजो असे या महिलेचे नाव असून ढिगाऱ्याखाली दबल्याने तिचा मृत्यू झाला.
सोमवारी नीतू यांच्या मृतदेहाची ओळख पटली. नीतू जोजो या वायनाडच्या चुरलमाला येथील खासगी रुग्णालयातील कर्मचारी होत्या. हा अपघात जेव्हा झाला तेव्हा नीतू घरी होत्या. त्यांनी आपत्कालीन सेवांना सतर्क केले आणि मदतीची विनंती केली.
डॉ. पलियाल यांनी सांगितले की, २९ जुलैला भूस्खलनानंतर नीतूचा फोन आला होता. ती घाबरून म्हणाली की, आमची घरे भरून गेली आहेत. मलबा येत आहे. यानंतर दुसऱ्या भूस्खलनात तिचा संपर्क तुटला. दरम्यान, भूस्खलनातील बळींची संख्या ३८७ वर पोहोचली आहे.