Delhi : भरधाव BMW च्या धडकेत अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा पत्नीचा आरोप, महिला चालक अटकेत

जधानी दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट परिसरात रविवारी (दि.१४) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव BMW कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील उपसचिवांचा मृत्यू झाला. तर, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
Delhi : भरधाव BMW च्या धडकेत अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा पत्नीचा आरोप, महिला चालक अटकेत
Published on

राजधानी दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट परिसरात रविवारी (दि.१४) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव BMW कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अर्थ मंत्रालयाच्या उपसचिवांचा मृत्यू झाला. तर, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. वारंवार विनंती करूनही पतीला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप जखमी पत्नीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि. १५) महिला चालकाला अटक केली आली.

अपघातात नवजोत सिंग (वय ५७) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाली आहे. गगनप्रीत या चालक महिलेला अटक करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी नवजोत सिंग व त्यांची पत्नी दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात असणारी BMW त्यांच्या दुचाकीला धडकली. कारमध्ये गगनप्रीतसोबत तिचा पती परीक्षित मक्कर व दोन मुले होती. ही कार परीक्षित मक्कर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी दाम्पत्याने त्यांना १९ किलोमीटर दूर असलेल्या न्यू लाईफ रुग्णालयात नेले. हे रुग्णालय गगनप्रीतच्या माहेरच्या परिसरात असून रुग्णालयाचा मालक तिचा परिचित असल्याची माहिती समोर आली आहे.

वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

संदीप कौर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. "अपघातानंतर नवजोत श्वास घेत होते. मी वारंवार जवळच्या रुग्णालयात नेण्याची विनंती केली. मात्र, चालक महिला व तिच्या पतीने ती विनंती फेटाळून आम्हाला जाणीवपूर्वक दूरच्या रुग्णालयात नेले," असे त्यांनी म्हटले. जखमींना कार्गो व्हॅनमधून कोणत्याही प्राथमिक उपचारांशिवाय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर नवजोत सिंग यांना मृत घोषित केले.

दिल्ली पोलिसांनी महिला चालक गगनप्रीतला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गगनप्रीत व तिचा पती परीक्षित मक्कर यांचे जबाब अद्याप पोलिसांनी नोंदवलेले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in