दिल्लीच्या चावडी बाजारात मोठी दुर्घटना! बांधकामाधीन तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, एक जखमी

दिल्लीच्या चावडी बाजारात बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक कोसळली. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
दिल्लीच्या चावडी बाजारात मोठी दुर्घटना! बांधकामाधीन तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, एक जखमी
दिल्लीच्या चावडी बाजारात मोठी दुर्घटना! बांधकामाधीन तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, एक जखमीX|IANS
Published on: 

नवी दिल्ली : दिल्लीतील चावडी बाजार परिसरात गुरुवारी (दि. ५) सकाळी तीन मजली बांधकामाधीन इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. चावडी बाजार मेट्रो स्थानकाजवळील गली सितारा येथे ही घटना घडली. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आलं.

गजबजलेल्या बाजारपेठेत इमारत कोसळली

'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.

चावडी बाजार हा जुन्या दिल्लीतील गजबजलेला व्यापारी परिसर आहे. येथील रस्ते आणि गल्ल्या अरुंद असून, दिवसभर व्यापारी आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असते. दिवाळी जवळ आल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशा वेळी इमारत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली.

एक दिवस आधी १६० वर्षे जुनी इमारतही कोसळली

विशेष म्हणजे, या दुर्घटनेच्या एक दिवस आधीच चांदनी चौकातील ऐतिहासिक टाऊन हॉल इमारतीचा काही भाग कोसळला होता. तब्बल १६० वर्षांहून अधिक जुनी ही इमारत दिल्ली महापालिकेच्या मालकीची असून, तिला संरक्षित वारसा वास्तूचा दर्जा आहे.

या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग, छताचे लाकडी आधार, मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंती आणि प्रवेशद्वारावरील घड्याळाचा भाग कोसळल्याचं वृत्त आहे.

दिल्लीच्या चावडी बाजारात मोठी दुर्घटना! बांधकामाधीन तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, एक जखमी
Mumbai : सीएसएमटीत स्लॅबचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चांदनी चौकातील टाऊन हॉलमध्ये पूर्वी दिल्ली महापालिकेचं मुख्य कार्यालय होतं. मात्र, २०११-१२ मध्ये महापालिकेचं कार्यालय दुसरीकडे हलवण्यात आलं. त्यानंतर या इमारतीचा फारसा वापर होत नव्हता.

गेल्या काही वर्षांत इमारतीचं प्लास्टर निघणं, खिडक्या तुटणं आणि इमारतीचे काही भाग जीर्ण होणं अशा समस्या दिसत होत्या. आता सलग दोन दिवसांत इमारती कोसळण्याच्या घटना घडल्याने जुन्या इमारतींची देखभाल आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)