सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

नीट परीक्षेतील गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रशासनाला दिले.
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
Published on

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रशासनाला दिले. तब्येत खालावल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

नागरिकाचे जीवन अत्यंत मौल्यवान असून, त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी वैद्यकीय प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट मत मुख्य न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच वांगचुक यांच्या प्रकृतीची सरकारी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

वांगचुक यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या एका जनहित याचिकेवरील सुनावणी पूर्ण करताना न्यायालयाने हा आदेश दिला. नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने २५ दिवसांहून आंदोलन सुरु आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in