माझी वेळ मला ठाऊक आहे; उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे स्पष्टीकरण
बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःच्या दाव्याबाबत येणाऱ्या वृत्तांना फेटाळून लावताना सांगितले की, काही लोक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते पक्षाप्रती निष्ठावान आहेत. माझी वेळ मला ठाऊक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, "मी नेतृत्वाच्या विषयावर काहीच बोललो नाही. या बाबतीत काही गैरसमज झाला आहे. काही नागरिक म्हणाले की चांगले दिवस येत आहेत. मी फक्त म्हणालो, पाहा मग. मला माझा वेळ माहीत नाही, असे नाही. काही माध्यमे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला गोंधळ होण्याची गरज नाही. मला माझा वेळ ठाऊक आहे. माझा वेळ म्हणजे २०२८ मध्ये पुन्हा कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आणणे. हाच माझा प्राधान्यक्रम आहे.
हे वक्तव्य त्यांनी लाळबाग येथे झालेल्या जनसंपर्क कार्यक्रमात एका व्यक्तीने कर्नाटक सरकारबद्दल अनेक प्रश्न विचारल्यानंतर केले. दरम्यान, राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या बातम्या समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १३ ऑक्टोबर रोजी मंत्र्यांसाठी बैठक बोलावली आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला नकार देत सांगितले की हा फक्त अनौपचारिक स्नेहसंमेलन आहे.
सिद्धरामय्या म्हणाले, 'मी मंत्र्यांना जेवणासाठी बोलावले आहे. कारण बरेच दिवस भोजनासाठी मंत्र्यांना बोलवले नव्हते. या रात्रभोजनाचा मंत्रिमंडळ फेरबदलाशी काहीही संबंध नाही., असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवकुमार आठवड्यात यांनी गेल्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांना सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेबाबत इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, त्यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जी.सी. चंद्रशेखर यांना अशा व्यक्तींना नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवकुमार म्हणाले, "भाजप काय बोलतो यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. त्यांनी जे हवे ते बोलू द्या. मी आमच्या कार्याध्यक्षांना निर्देश दिले आहेत की अशा लोकांना नोटीस द्या. कोणीही मुख्यमंत्रीपदाबद्दल काहीही बोलू नये."
यांनी ते पुढे म्हणाले, 'मुख्यमंत्रीपद वाटपाबाबत चर्चा करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मी दोघेही मिळून काम करत आहोत. आम्ही पक्षश्रेष्ठींच्या सूचनांचे पालन करत आहोत.' २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर शिवकुमार आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी आपापले दावे सादर केले होते. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मध्यस्थीने झालेल्या अनेक चर्चेनंतर सिद्धरामय्या यांची निवड झाली. त्यावेळी शिवकुमार यांनी फेरपालटाच्या तत्त्वावर मुख्यमंत्रीपद मान्य केल्याची चर्चा होती, मात्र काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने कधीही त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही.
अनेक केंद्रीय नेते आणि सिद्धरामय्या यांनी मात्र असा कोणताही करार झाल्याचे नाकारले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याचे स्पष्ट केले आहे.