मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल

चोर आणि रात्रीची झोप यांचे दूरान्वये नाते नाही. चोराला जर चोरी करायची असेल तर रात्रीच्या झोपेसोबत तडजोड करावी लागते. ही झोप चोरी करताना आवरता आली नाही, तर मात्र मग मुश्किल होतं. अशीच अचानक लागलेली झोप एका चोराला चांगलीच महागात पडली आहे. सध्या या अजब चोरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल
Published on

चोर आणि रात्रीची झोप यांचे दूरान्वये नाते नाही. चोराला जर चोरी करायची असेल तर रात्रीच्या झोपेसोबत तडजोड करावी लागते. ही झोप चोरी करताना आवरता आली नाही, तर मात्र मग मुश्किल होतं. अशीच अचानक लागलेली झोप एका चोराला चांगलीच महागात पडली आहे. सध्या या अजब चोरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील नोआमुंडी येथे हा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे. वीर नायक नावाच्या तरुणाने एका मंदिरात चोरी केली. पण, दारू इतकी जास्त झाली होती, की त्याला नशेमुळे झोप अनावर झाली आणि तो चक्क मंदिरातच झोपी गेला. सकाळी पुजारी आणि स्थानिकांनी पाहिलं, तर मंदिरात एक अज्ञात व्यक्ती गाढ झोपलेली! शंका आल्याने त्याची बॅग तपासली आणि मंदिरातील पूजा साहित्य, दागिने, घंटा, थाळ्या वगैरे सामान सापडलं.

स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वीर नायकने कबुल केलं आहे की, चोरीच्या आधी त्याने मित्रांसोबत खूप दारू प्यायली होती. नंतर, त्याने काली मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि वस्तू, सोने-चांदीचे दागिने एका बॅगेत भरले. पण, नशा एवढी होती की बॅग भरून तो काही पावलंही जाऊ शकला नाही आणि तिथेच झोपून गेला. त्याच्याकडून सर्व चोरीचं सामान हस्तगत करण्यात आलं असून आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in