Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

या घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर
Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर
Published on

गोव्यातील अर्पोरा भागात असणाऱ्या बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) या नाईट क्लबमध्ये शनिवारी (दि.६) सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. "या घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू आहेत." अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या वारसांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "अर्पोरा येथे झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेच्या परिस्थितीचा मी बारकाईने आढावा घेत आहे. या घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

पुढे ते म्हणाले, "घटनेचे कारण स्पष्ट करण्यासाठी व जबाबदारी निश्चित करण्यासाठी मी संपूर्ण प्रकरणाची मॅजिस्ट्रियल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X च्या माध्यमातून सांगितले, "गोव्याच्या अर्पोरा येथे झालेल्या दुर्घटनेत जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी म्हणाले, "गोव्यातील अर्पोरा येथे झालेली आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो."

पुढे ते म्हणाले, "या परिस्थितीबाबत मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे."

अरुंद मार्गांमुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा

हा नाईटक्लब आर्पोरा नदीच्या मागील बाजूस असून येथे ये-जा करण्यासाठी अत्यंत अरुंद रस्ता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना क्लबपर्यंत पोहोचता आले नाही आणि त्यांची वाहने सुमारे ४०० मीटर अंतरावर उभी करावी लागली. अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, "अरुंद मार्गांमुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले, त्यामुळे आग नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरले."

logo
marathi.freepressjournal.in