Goa Nightclub Fire Update : गोव्यातील ‘बर्च’ नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी ५ जणांना अटक; आगीचा नवा व्हिडीओ आला समोर

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब (Birch by Romeo Lane) नाईट क्लबमध्ये शनिवारी (दि.६) मध्यरात्री भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे दाखवणारा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Goa Nightclub Fire Update : गोव्यातील ‘बर्च’ नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी ५ जणांना अटक; आगीचा नवा व्हिडीओ आला समोर
Published on

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब (Birch by Romeo Lane) नाईट क्लबमध्ये शनिवारी (दि.६) मध्यरात्री भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून आठवडाभरात त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. याप्रकरणी ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’चा व्यवस्थापक आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आज (दि.८) ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे दाखवणारा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

स्पार्कने घेतली आग; काही सेकंदांत छत पेटले

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक इलेक्ट्रॉनिक फटाका बेली डान्स परफॉर्मन्सदरम्यान पेटवला जात असल्याचे दिसते. फटाक्याच्या ठिणग्या थेट बांबूने सजवलेल्या छताला लागतात आणि काहीच सेकंदांत छत जळून आग झपाट्याने पसरते. या आगीत मृत झालेल्या २५ जणांमध्ये ५ पर्यटकांचाही समावेश होता.

"आम्ही हादरलो आहोत...

या दुर्घटनेनंतर बर्च बाय रोमिओ लेन क्लबच्या मालकांपैकी एक असलेले सौरभ लुथ्रा यांनी इन्स्टाग्रामवर दुःख व्यक्त केले. पोस्टमधे ते म्हणाले, “या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आम्हाला अत्यंत दुःख आहे. व्यवस्थापन हादरून गेले आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांसोबत आहोत आणि त्यांना आम्ही शक्य ती सर्व मदत देऊ.”

दरम्यान, क्लबमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, परवानगी प्रक्रियेतील अनियमितता आणि संभाव्य निष्काळजीपणाबाबत चौकशी अधिक वेगात सुरू आहे.

Goa Nightclub Fire Update : गोव्यातील ‘बर्च’ नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी ५ जणांना अटक; आगीचा नवा व्हिडीओ आला समोर
Goa Nightclub Fire Update : गोव्यातील ‘बर्च’ नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी ५ जणांना अटक; आगीचा नवा व्हिडीओ आला समोर

पाच जण अटकेत

गोवा पोलिसांनी या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक केले असल्याची माहिती दिली.
चार जणांना रविवारी अटक झाली, तर क्लबचा ऑपरेशन्स मॅनेजर असलेल्या एका आरोपीला सोमवारी दिल्लीमध्ये पकडण्यात आले.

राजीव मोडक (मुख्य जनरल मॅनेजर), विवेक सिंग (जनरल मॅनेजर), राजीव सिंघानिया (बार मॅनेजर), रियान्शू ठाकूर (गेट मॅनेजर), भारत सिंह (ऑपरेशन्स मॅनेजर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या मते, "ही आग केवळ निष्काळजीपणाची घटना नाही. काही गोष्टी गांभीयाने न घेतल्यामुळे ही घटना घडली. क्लबला परवानगी देणाऱ्या काही अधिकाऱ्यांबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत."

logo
marathi.freepressjournal.in