पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

ग्रेटर नोएडामध्ये पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत...
पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू
पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

पत्नीशी सुरू असलेला वाद टाळण्यासाठी एका तरुणाने घराच्या बाल्कनीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. ग्रेटर नोएडामध्ये २१ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत तरुणाचं नाव हर्षित लवानिया (३१) असं आहे. ग्रेटर नोएडातील सेंट्युरियन पार्क ट्रॉपिकल गार्डन सोसायटीमध्ये या आठवड्याच्या सुरूवातीला ही घटना घडली.

सहा महिन्यांपासून पत्नीपासून वेगळा राहायचा

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षितचं २०२४ मध्ये लग्न झालं होतं. मात्र, पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून दोघं वेगवेगळे राहत होते. हर्षित हा सोसायटीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.

घटनेच्या दिवशी त्याची पत्नी त्याला भेटण्यासाठी फ्लॅटवर आली होती. तिने दरवाजा ठोठावला आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा वाद होण्याच्या भीतीने हर्षितने दरवाजा उघडण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू
२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

दार उघडण्यासाठी सुरक्षारक्षकांना बोलावलं अन्...

हर्षित दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या पत्नीने सोसायटीतील सुरक्षारक्षकांना मदतीसाठी बोलावलं. दरवाजा उघडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हर्षितने घरातून बाहेर पडण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला. त्याने २१ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खालच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला.

रुग्णालयात नेलं, पण जीव वाचला नाही

हर्षित खाली कोसळल्याचं समजताच सोसायटीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. हर्षितच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पत्नीशी सुरू असलेल्या वादामुळे तो मानसिक तणावाखाली होता. मात्र, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू
पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

या घटनेप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस हर्षितच्या पत्नीची चौकशी करत असून, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. हर्षित बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न नेमका कसा करत होता आणि त्यानंतर काय घडलं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in