संघ शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करतेय - राहुल गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशातील शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केला.
राहुल गांधी
राहुल गांधी(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशातील शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केला. इंडिया आघाडीच्या विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधी जंतरमंतर येथे आले असता त्यांनी हा आरोप केला. आरएसएस देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.

आज भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरएसएसचे कुलगुरू आहेत. लवकरच राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरूही आरएसएसचे असतील. यंत्रणा त्यांच्या हातात पडली तर सर्व काही संपेल. देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कुंभमेळ्यावर बोलले होते. कुंभमेळ्यावर बोलणे चांगले आहे, पण त्यांनी भविष्याबद्दलही बोलले पाहिजे. त्यांनी बेरोजगारीविरुद्ध बोलावे. तुमच्या सरकारने या देशातील तरुणांना बेरोजगार केले. तुम्ही त्याबद्दल बोलले पाहिजे, असे गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in