७ फेरे अन् ४ बायका! लग्नमंडपात घडलं असं काही की हसू आवरणं कठीण; Video व्हायरल

दररोज सोशल मीडियावर कुठला ना कुठला व्हिडिओ व्हायरल होत असतो. कधी डोळ्यांत पाणी आणणारा, कधी धक्का देणारा, तर कधी पोट धरून हसवणारा! सध्या असाच एक भारतीय लग्नसोहळ्यातील व्हिडिओ नेटकर्‍यांचं लक्ष वेधून घेत आहे. नवरा-नवरी अग्नीभोवती फेरे घेत असतानाच असं काही घडतं, की पाहणाऱ्यांचं हसू थांबतच नाही.
७ फेरे अन् ४ बायका! लग्नमंडपात घडलं असं काही की हसू आवरणं कठीण; Video व्हायरल
Published on

दररोज सोशल मीडियावर कुठला ना कुठला व्हिडिओ व्हायरल होत असतो. कधी डोळ्यांत पाणी आणणारा, कधी धक्का देणारा, तर कधी पोट धरून हसवणारा! सध्या असाच एक भारतीय लग्नसोहळ्यातील व्हिडिओ नेटकर्‍यांचं लक्ष वेधून घेत आहे. नवरा-नवरी अग्नीभोवती फेरे घेत असतानाच असं काही घडतं, की पाहणाऱ्यांचं हसू थांबतच नाही.

एक नवरा अन् चार बायका

हा व्हिडिओ कनिष्का चौधरीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की कनिष्का आणि तिचा नवरा नितीश मंडपात लग्नाचे फेरे घेत आहेत. पण नवरीचा लेहंगा इतका जड होता की तिच्या तीन मैत्रिणी पुढे येतात. सुरुवातीला सगळं अगदी सहज आणि सामान्य वाटतं. मैत्रिणी नवरीचा लेहेंगा पकडून तिला मदत करत असतात. मात्र फेऱ्यांच्या ओघात त्या नकळत नवरीसोबतच अग्नीभोवती चालायला लागतात. काही क्षणातच मंडपात असं दृश्य तयार होतं की, नवऱ्या मुलासोबत एक नाही तर चार जणी फेरे घेत आहेत! यानंतर संपूर्ण मंडपात एकच हशा पिकतो. नवरी लाजत-हसत मागे वळून पाहते, तर नवराही ही मजेशीर परिस्थिती पाहून हसू आवरू शकत नाही. मैत्रिणी लगेच मागे सरकतात आणि काही क्षणांसाठी लग्नविधी पूर्णपणे हसण्याखिदळण्यात बदलतो.

या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लक्षात येतं की नवरी भारतीय आहे आणि तिच्या मैत्रिणी मात्र परदेशी आहेत. त्यामुळेच भारतीय संस्कृती-परंपरा याबाबत योग्य माहिती नसल्यामुळे त्या नवरीचा लेहेंगा सावरत तिच्यामागे चालत होत्या असं स्पष्ट होतंय. काहीही असलं तरी नेटकरी मात्र व्हिडिओ बघून लोटपोट झाले असून कमेंट्समध्येही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. “एकावर चार फ्री”, “भावा तुझी मज्जा आहे” अशा मजेशीर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय. एकूणच, लग्नसोहळ्यातील असे हलकेफुलके आणि गमतीशीर क्षण किती खास असतात, याचं हे सुंदर उदाहरण ठरत असून, त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in