
रामायणातील जटायूची शौर्यकथा आपल्याला सर्वांना माहीत आहे. सीतेचे रक्षण करताना जटायूने रावणाशी लढत आपले प्राण अर्पण केले. आजही त्याचे शौर्य भारतीय संस्कृतीत आदर्श मानले जाते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे काही लोकांना असं वाटलं की जणू जटायू पुन्हा पृथ्वीवर अवतरला आहे.
या व्हिडिओत एक भव्य, विशाल पंखांचा पक्षी रस्त्याच्या कडेला शांतपणे बसलेला दिसतोय. त्याच्या आकारामुळे आणि तेजस्वी रूपामुळे अनेक लोकं त्याची तुलना जटायूसोबत करत आहेत. आजूबाजूचे लोकं त्याचे फोटो-व्हिडिओ काढताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसतंय, की हा पक्षी लोकांच्या अगदी जवळ बसलेला आहे. तो कोणत्याही प्रकारे लोकांना घाबरवत नाहीये. त्यांना इजा करत नाहीये. त्याचा शांत व शालीन स्वभाव लोकांना आश्चर्यचकित करत आहे. काही लोकांनी याला 'प्रकृतिचा चमत्कार' म्हटले, तर काहींनी याला 'रामायण कालातील संकेत' मानले. पण हा पक्षी नेमका आहे तर कोण?
पाहा व्हिडिओ -
हा पक्षी 'एंडियन कोंडोर' (Andean Condor) आहे. जो दक्षिण अमेरिका, विशेषतः एंडीज पर्वतरांगेत आढळणारा जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक. त्याचे पंख साडेसहा ते दहा फूटांपर्यंत पसरतात. भारतात तो फारच दुर्मिळ असून, सर्कशीत किंवा पक्षीशाळेत अपवादानेच पाहायला मिळतो. त्यामुळे, त्याला पाहून लोकांनी धार्मिक संदर्भ लावले.