

१ जून २०२६ पासून देशभरात अनेक आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या मासिक खर्चावर आणि घरगुती बजेटवर होऊ शकतो. LPG सिलेंडरचे दर, UPI व्यवहार, बँकिंग शुल्क, पॅन कार्ड नियम, ATM व्यवहार आणि FD व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LPG सिलेंडरच्या दरांमध्ये होऊ शकतो बदल
दर महिन्याप्रमाणे यावेळीही तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू होण्याची शक्यता
डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे NPCI कडून UPI व्यवहारांसाठी नवे सुरक्षा नियम लागू केले जातील. पैसे पाठवताना आता फक्त लाभार्थ्याच्या बँक खात्यात नोंद असलेले अधिकृत नावच स्क्रीनवर दिसेल. यामुळे चुकीच्या नावांमुळे किंवा बनावट QR कोडद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ATM आणि बँकिंग सेवांवरील शुल्क वाढणार
बँकिंग सेवांवरील शुल्कांमध्येही वाढ होऊ शकते. ATM मधून मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी अधिक शुल्क आकारलं जाऊ शकतं. काही बँकांनी डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याच्या दैनंदिन मर्यादांमध्येही बदल करण्याची शक्यता वर्तवली आहे.
पॅन कार्ड नियमांमध्ये बदल
नवीन आयकर नियमांनुसार मालमत्ता व्यवहारांसाठी पॅन कार्डच्या अटींमध्ये बदल होणार आहेत. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड रिपोर्टिंग अनिवार्य करण्यात येणार असून, रोख रक्कम काढण्याच्या नियमांमध्येही बदल लागू होऊ शकतात.
FD आणि क्रेडिट कार्ड नियमांवरही परिणाम
काही बँका क्रेडिट कार्डवरील इंधन व्यवहार आणि युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त शुल्क लागू करू शकतात. FD च्या व्याजदरांमध्येही बदल होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी नवीन दर तपासूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.
सौर पॅनल आणि विमा योजनांमध्ये बदल शक्य
सौर पॅनलसंदर्भातील सरकारी धोरणात बदल झाल्यास त्याचा परिणाम अनुदान आणि बसवण्याच्या खर्चावर होऊ शकतो. तसेच कौटुंबिक विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोबाइल बिलावरही पडू शकतो परिणाम
मोबाइल आणि टेलिफोन सेवांवरील शुल्कांमध्येही बदल होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांच्या मासिक बिलात वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी खर्चाचे योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.