Karnataka : धक्कादायक! पत्नीसोबत सेल्फी काढणं बेतलं जीवावर; पत्नीने पतीला कृष्णा नदीत दिले ढकलून|Video

कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. वडगेरा तालुक्यातील गुर्जापूर पुलावर एका महिलेने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने आपल्या पतीला थेट कृष्णा नदीत ढकलून दिले. ही घटना शनिवारी (१२ जुलै) घडली असून, सुदैवाने पतीला ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Karnataka : धक्कादायक! पत्नीसोबत सेल्फी काढणं बेतलं जीवावर; पत्नीने पतीला कृष्णा नदीत दिले ढकलून|Video
Published on

कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. वडगेरा तालुक्यातील गुर्जापूर पुलावर एका महिलेने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने आपल्या पतीला थेट कृष्णा नदीत ढकलून दिले. ही घटना शनिवारी (१२ जुलै) घडली असून, सुदैवाने पतीला ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अशी घडली घटना -

दुचाकीवरून प्रवास करत असताना दाम्पत्य थोडा वेळ पुलावर थांबले आणि तिथेच दोघं सेल्फी काढत होते. त्या दरम्यान अचानक पती नदीत पडला. प्रथम पत्नीने नातेवाईकांना सांगितले, की पती पाय घसरून नदीत पडला. मात्र, तिचा पती नदीत पडला नसून त्याने जवळच्याच खडकाला पकडून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. त्याची हाक ऐकून काही ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि त्यांनी दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

व्हिडिओ व्हायरल; तपास सुरू -

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिला पुलावर उभी असून काही स्पष्टीकरण देत असल्याचेही दिसत आहे.

पतीला वाचवल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पडण्याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की तो अपघाताने पडला नसून त्याला त्याच्या पत्नीने जीवे मारण्याच्या उद्देशाने नदीत ढकलले. त्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं आहे. तथापि, अद्याप कोणत्याही पक्षाने पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

पोलिसांची चौकशी सुरू -

ही घटना रायचूर व यादगिरी जिल्ह्याच्या सीमेलगत घडल्यामुळे रायचूर पोलिसांनी संबंधित दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावले आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जबाब आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in