कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर

केरळमध्ये घरासमोर गाडी रिव्हर्स घेताना पतीचं नियंत्रण सुटलं आणि कार पत्नीच्या अंगावर गेली. या अपघातात ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, CCTV व्हिडिओ समोर आला आहे.
कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर
कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर
Published on: 

केरळ : घरासमोर कार पार्क करताना पतीचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. पती कार मागे घेत असताना आधी घराच्या खांबाला, त्यानंतर अंगणात उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीला धडक बसली. याचवेळी कार पत्नीच्या अंगावर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील किडंगूर येथील साऊथ पत्तेरिल परिसरात ही घटना घडली. मृत महिलेचं नाव शोभना कुमारी (६६) असं असून, त्या भारतीय विद्यामंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका होत्या. शोभना कुमारी आणि त्यांचे पती मुरलीधरन पिल्लई हे बाहेर फिरून घरी परतले होते. घरासमोर आल्यानंतर शोभना कुमारी कारमधून खाली उतरल्या. त्यानंतर त्यांचे पती कार मागे घेऊन घराच्या पार्किंगमध्ये लावत होते.

कार रिव्हर्स घेताना चाकाखाली चिरडून पत्नीचा करुण अंत; अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर
आईला घरकामात मदत कर म्हणून वडिलांनी मोबाईल हिसकावला; संतापलेल्या मुलीने वडिलांनाच संपवलं

कार मागे घेताना पतीचं नियंत्रण सुटलं

कार मागे घेत असताना अचानक पतीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. कार आधी पार्किंगमधील खांबाला धडकली. त्यानंतर अंगणात उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीला धडक बसली. याचवेळी कार शोभना कुमारी यांच्या अंगावर गेली आणि त्या गाडीखाली चिरडल्या गेल्या. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये शोभना कुमारी कारमधून खाली उतरताना आणि त्यानंतर पती कार मागे घेत असताना अपघात घडल्याचं दिसतं. घरासमोरच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)