रेल्वेमध्ये ३ प्रवाशांना जाळणाऱ्या आरोपीला रत्नागिरीतून अटक; केरळमध्ये घडला होता धक्कादायक प्रकार

आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली असून केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली
रेल्वेमध्ये ३ प्रवाशांना जाळणाऱ्या आरोपीला रत्नागिरीतून अटक; केरळमध्ये घडला होता धक्कादायक प्रकार

काही दिवसांपूर्वी केरळमधील कोळीकोडमध्ये अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसचा एक डब्बा जाळण्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये २ वर्षाच्या मुलाचाही समावेश होता. गेल्या ३ दिवसांपासून केरळ एटीएस आरोपी शाहरुख सैफीचा शोध घेत होती. अखेर त्याला रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख सैफी हा नोएडाचा रहिवासी आहे. अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना त्याने पेट्रोल ओतून रेल्वेचा डब्बा पेटवून दिला. यामध्ये ३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळावरून आरोपीने पळ काढल्यामुळे गेले काही दिवस त्याची शोधाशोध सुरु होती. त्याच्या फोनच्या लोकेशनवरून त्याचा पत्ता लागला आणि तो रत्नागिरीमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर केरळ एटीएसने दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांनी त्याला रत्नागिरी स्थानकातून अटक केली. त्याचा ताबा मिळवण्यासाठी आता केरळ पोलीस रत्नागिरीमध्ये दाखल झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in