पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीववरील भारताचा संताप कमी होण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणी सेलिब्रिटी चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडिया युजर्सनाही राग अनावर झाला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यासोबत लक्षद्वीपची तुलना होऊ लागली आणि 'बॉयकोट मालदीव' ट्रेंड सुरू झाला. आता, सोशल मीडियावर मीम्स देखील व्हायरल होत आहे. काही इंटरनेट वापरकर्त्यांनी हलक्या-फुलक्या पद्धतीने वादावर प्रतिक्रिया देणारे मजेदार मीम शेअर केले आहेत. भारताच्या केंद्रशासित प्रदेशाचा जयजयकार करणाऱ्या आणि मालदीवच्या पर्यटनापासून परावृत्त करणाऱ्या व्हायरल झालेल्या काही पोस्ट खास तुमच्यासाठी आणल्या आहेत.
पर्यटन -
नुकत्याच मालदीव-लक्षद्वीप या वादामु्ळे दोन पर्यटन स्थळांच्या पर्यटनावर कसा परिणाम होईल, या बाबतीलता अंदाज साधत युजर्सने तयार केलेले मीम्स देखील समोर आले. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोंमधून भारतीयांनी आंतरराष्ट्रीय पर्यायाऐवजी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. भारतीयांमूळे लक्षद्वीपचे पर्यटन कसे वाढेल? हे मिम्सच्या माध्यमांतून दाखवण्यात आलं.
खेळ-
दरम्यान, आणखी एक मीम जो इंटरनेटवर तुफान शेअर केला जातय. खेळांसंबंधीचा हा मीम आहे. बीसीसीआयला लक्षद्वीपमध्ये सामन्याचे ठिकाण बुक करण्याची सूचना केल्याबद्दल तो व्हायरल झाला. या मीममध्ये क्रिकेट प्रशासक जय शहा आणि त्याचे वडील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे शक्य असल्यास 'चर्चा' करताना दाखवले.