
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुले आणि मुली हातात झाडू व फडका घेऊन वर्गाची साफसफाई करताना दिसत आहेत. शाळेच्या गणवेशात असलेली ही मुले पुस्तकं आणि पेन्सिलऐवजी झाडू-फडकी हातात घेत वर्ग झाडताना दिसताच पालक आणि नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.
ही घटना छतरपूर जिल्ह्यातील डेहरापहाडी शाळेतील असून, विशेष म्हणजे ही शाळा कलेक्टरांच्या बंगल्याच्या समोर आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तीन मुली आणि एक मुलगा वर्गात फरशीवर फडका मारताना आणि झाडू मारताना स्पष्टपणे दिसत आहेत.
व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांनी शाळेच्या शिक्षकांवर आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून, "विद्यार्थ्यांकडून काम करून घेण्याऐवजी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे" अशी टीका केली आहे. सोशल मीडियावरही या घटनेवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.