चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी ३ आरोपींना अटक

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना, विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे.
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी ३ आरोपींना अटक
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी ३ आरोपींना अटक
Published on

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना, विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेल्या या तीन आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. ६ मे रोजी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम भागात ही हत्या झाली होती. या घटनेच्या तपासासाठी तातडीने 'एसआयटी'ची स्थापना करण्यात आली होती.

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी ३ आरोपींना अटक
Mumbai : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी सुरक्षारक्षक बडतर्फ

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात अनेक डिजिटल धागेदोरे आणि आंतरराज्य कनेक्शन समोर आले आहेत. या तपासात आम्हाला मोठे यश मिळाले आहे. प्राथमिक तपासातूनच हल्लेखोर पश्चिम बंगालबाहेरचे असल्याचे संकेत मिळाले होते. तांत्रिक पाळत आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे एसआयटीची पथके उत्तर प्रदेश आणि बिहारला रवाना करण्यात आली होती. तेथून या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना ट्रान्झिट रिमांडवर बंगालमध्ये आणले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in