मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये येणार; भारतीय हवामान खात्याची माहिती

अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असली तरी ज्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे तो मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.
मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये येणार; भारतीय हवामान खात्याची माहिती
Published on

नवी दिल्ली : अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असली तरी ज्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे तो मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून यंदा ४ दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पोषक हवामान असल्याने मान्सूनचे आगमन यंदा वेळेआधी होणार आहे. तसेच हवामान विभागाने यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.

हवामान खात्याच्या मते, ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल. जर मान्सून २७ मे रोजी आला तर २००९ नंतर पहिल्यांदाच तो केरळमध्ये इतक्या लवकर पोहोचेल. २००९ मध्ये मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये

पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १३ मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने सांगितले की, “यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्यपेक्षा चांगला असेल. हवामान विभाग १०४ ते ११० टक्के पाऊस सामान्यपेक्षा चांगला मानतो. हे पिकांसाठी एक चांगले संकेत आहे. आयएमडी प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, २०२५ मध्ये १०५ टक्के म्हणजेच ८७ सेमी पाऊस पडू शकतो.”

logo
marathi.freepressjournal.in