Milk Price Hike : उद्यापासून दुधाचे दर वाढणार; मदर डेअरीचा ग्राहकांना झटका; लिटरमागे ४ रुपयांपर्यंत दरवाढ, पाहा नवे दर

Mother Dairy Milk Price Hike: मदर डेअरीचं दूध १२ नोव्हेंबरपासून प्रतिलिटर २ ते ४ रुपयांनी महागणार आहे. फुल क्रीम दूध ७६ रुपयांवर पोहोचणार. दुधाचे नवे दर जाणून घ्या.
Milk Price Hike : उद्यापासून दुधाचे दर वाढणार; मदर डेअरीचा ग्राहकांना झटका; लिटरमागे ४ रुपयांपर्यंत दरवाढ, पाहा नवे दर
Milk Price Hike : उद्यापासून दुधाचे दर वाढणार; मदर डेअरीचा ग्राहकांना झटका; लिटरमागे ४ रुपयांपर्यंत दरवाढ, पाहा नवे दरसंग्रहित छायाचित्र
Published on: 

दिवाळीनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमूलने तूप आणि बटरच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दुधाच्या प्रकारानुसार प्रतिलिटर २ ते ४ रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. हे नवे दर उद्यापासून म्हणजेच गुरुवार (दि. १२) पासून लागू होणार आहेत. त्यामुळे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) ग्राहकांना आता रोजच्या दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

कोणत्या दुधाचे दर किती वाढले?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मदर डेअरीने वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये फुल क्रीम दुधाच्या दरात सर्वाधिक ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर इतर दुधाच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ झाली आहे.

दुधाचे जुने आणि नवे दर पुढीलप्रमाणे :

  • फुल क्रीम दूध (१ लिटर) : आधी ७२ रुपये, आता ७६ रुपये

  • टोन्ड दूध (१ लिटर पिशवी) : आधी ६० रुपये, आता ६२ रुपये

  • टोन्ड दूध (मोठ्या प्रमाणातील विक्री, १ लिटर) : आधी ५८ रुपये, आता ६० रुपये

  • डबल टोन्ड दूध (१ लिटर) : आधी ५४ रुपये, आता ५६ रुपये

  • गायीचं दूध (१ लिटर) : आधी ६२ रुपये, आता ६५ रुपये

दूध महागण्यामागचं कारण काय?

मदर डेअरीने दुधाच्या किमती वाढवण्यामागे दूध खरेदीचा वाढता खर्च हे प्रमुख कारण दिलं आहे. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यासाठी कंपनीला पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मदर डेअरीला दूध विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपैकी सुमारे ७५ ते ८० टक्के रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाते.

Milk Price Hike : उद्यापासून दुधाचे दर वाढणार; मदर डेअरीचा ग्राहकांना झटका; लिटरमागे ४ रुपयांपर्यंत दरवाढ, पाहा नवे दर
Amul Price Hike : दिवाळीच्या तोंडावर अमूलचे तूप-लोणी महागले; नवे दर किती?

महिन्याच्या घरखर्चावर किती परिणाम होणार?

दुधाच्या दरात झालेली वाढ पाहता ती कमी वाटू शकते. मात्र, दररोज दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या महिन्याच्या खर्चावर याचा परिणाम होणार आहे.

उदाहरणार्थ, एखादं कुटुंब दररोज एक लिटर फुल क्रीम दूध खरेदी करत असेल, तर त्यांना आता रोज ४ रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच महिन्याला सुमारे १२० रुपये अतिरिक्त खर्च होईल. तर दररोज दोन लिटर दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबाला महिन्याला जवळपास २४० रुपये जास्त मोजावे लागतील. हा अंदाज ३० दिवसांच्या वापरावर आधारित आहे.

दरम्यान, मदर डेअरीने यापूर्वी १४ मे रोजीही दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. सध्या ही दरवाढ दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांसाठी लागू होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)