पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबाचा संतापजनक प्रकार; ८० वर्षांच्या वडिलांना गाडीत लॉक करून गेले ताजमहल फिरायला| Video

आग्रा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ ताजमहल परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईहून ताजमहल पाहायला आलेल्या कुटुंबाने आपल्या वृद्ध वडिलांना गाडीतच बांधून ठेवलं. गाडी लॉक असल्याने उष्णतेने ८० वर्षीय वृद्धाची तब्येत बिघडली. मात्र, पार्किंग कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधनाने या वृद्धाचे प्राण वाचले.
पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबाचा संतापजनक प्रकार; ८० वर्षांच्या वडिलांना गाडीत लॉक करून गेले ताजमहल फिरायला| Video
Published on

आग्रा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ ताजमहल परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईहून ताजमहल पाहायला आलेल्या कुटुंबाने आपल्या वृद्ध वडिलांना गाडीतच बांधून ठेवलं. गाडी लॉक असल्याने उष्णतेने ८० वर्षीय वृद्धाची तब्येत बिघडली. मात्र, पार्किंग कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधनाने या वृद्धाचे प्राण वाचले. ही घटना ताजमहलच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ घडली असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

काय घडलं नेमकं?

गुरुवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता ताजमहलच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळील पार्किंगमध्ये एक मुंबईची नंबर प्लेट असलेली इनोवा कार उभी होती. पार्किंगमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की, गाडीत एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यांच्या पोटाला आणि पायाला कपड्यांनी बांधलेलं होतं. गाडीत एसीदेखील बंद होता आणि कार पूर्णपणे लॉक होती.

पार्किंग कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरडाओरड करून मदतीसाठी तेथील सुरक्षारक्षकांना आणि स्थानिक लोकांना बोलावलं. त्यांनी गाडीची काच फोडून त्या वृद्धाला सुखरूप बाहेर काढलं.

"ते माझे वडील आहेत" म्हणत परतले कुटुंबीय -

घटनेचा गोंधळ ऐकून काही वेळाने संबंधित कुटुंब परत आलं. पोलिसांनी चौकशी केली असता ते सिद्धेश्वर तांदळे या व्यक्तीचे वडील असल्याचं समजलं. त्यांचं नाव हरीओम तांदळे असून त्यांना कारमधून बाहेर काढल्यावर प्रकृतीत सुधारणा झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र, यानंतर सिद्धेश्वर आपल्या वडिलांना घेऊन तिथून निघून गेले. सध्या या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पोलिसांचं म्हणणं -

आग्रा पोलिस उपायुक्त सोनम कुमार यांनीही यासंदर्भात सांगितलं की, "गाडीची काच फोडून वृद्ध व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. रुग्णवाहिका बोलावली होती. कार लॉक असल्याने त्यांची तब्येत बिघडली होती, पण बाहेर काढल्यानंतर प्रकृती सुधारली.''

सोशल मीडियावर संताप -

हे कुटुंब मुंबईतील रहिवासी आहेत. त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन, मुंबई पोलिस असे स्टीकर लावलेले होते. शिवाय, गाडीवर बरंच सामान देखील होतं. हे कुटुंब मुंबईहून ताजमहल फिरायला आले असावेत. वडिलांना चालणं शक्य नसेल म्हणून त्यांनी वडिलांना गाडीतच ठेवलं असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, सोशल मीडियावर मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in