पत्नीकडून छळ; नवऱ्याने थेट राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागितलं इच्छामरण

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. त्याने हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून आपली व्यथा मांडली. त्याचा हा फोटो व्हायरल होत आहे.
Photo - X (@Tajammulpundeer)
Photo - X (@Tajammulpundeer)
Published on

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. त्याने हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून आपली व्यथा मांडली. त्याचा हा फोटो व्हायरल होत आहे.

या युवकाचे नाव सुमित सैनी आहे. त्याच्या पत्नीचे नाव पिंकी आहे. तो मुजफ्फरनगरमध्ये गांधीनगर येथे राहतो. त्याने पत्नीच्या अत्याचाराला कंटाळून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे. तर, बॅनर घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या बॅनरवर त्याने 'मी गरीब असून माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून इच्छामरणाची मागणी करत आहे' असे लिहिले आहे.

सुमितचा विवाह अवघ्या वर्षभरापूर्वी, १४ जुलै २०२४ रोजी पार पडला होता. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की, ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते आणि तिचं हे लग्न तिच्या आई व मामांनी जबरदस्तीने लावून दिलं. त्यानंतर तिने नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला, असा आरोप सुमितने केला आहे.

सुमित म्हणतो, माझी पत्नी मला सतत मारहाण करते, शिवीगाळ करते आणि कधी कधी तर गळा दाबून मारण्याचा देखील प्रयत्न करते. मी खूप मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनंती करतो.

या प्रकारामुळे पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराचं हे आणखी एक प्रकरण समोर आलं असून, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in