२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने जनतेसाठी GST कर दरात बदल केले आहेत. GST परिषदेच्या बैठकीत विविध वस्तूंवरील करदरात कपात करण्यात आली असून, हा बदल उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर पासून लागू होत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर
Published on

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने जनतेसाठी GST कर दरात बदल केले आहेत. GST परिषदेच्या बैठकीत विविध वस्तूंवरील करदरात कपात करण्यात आली असून, हा बदल उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर पासून लागू होत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.

काय होणार स्वस्त?

ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलासा :

३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल व छोट्या कारवरील GST २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना वाहन खरेदीत काही प्रमाणात फायदा होणार आहे.

डेअरी व पॅकेज्ड फूड उत्पादने :

तूप, लोणी, चीज आणि इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील GST १२% वरून ५% पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा खर्च काहीसा हलका होणार आहे.

घरगुती उपकरणे :

ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर एसी व इतर उपकरणांमध्ये किंमतीत कपात करण्याची घोषणा झाली आहे. व्होल्टास, डायकिन, गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, हायर यांसारख्या कंपन्यांनी एसीच्या किमतीत २ ते ८ हजार रुपयांपर्यंत घट केली आहे. बॉशसह काही कंपन्यांनी डिशवॉशर व इतर उपकरणांवरही किंमत कपात केली आहे.

'या' वस्तूंच्या किमतीत बदल नाही

सरकारने काही वस्तूंचे दर जसेच्या तसे ठेवले आहेत.

०% स्लॅब : ताजी फळे व भाज्या, दूध, पीठ, ब्रेड, रोटी, पराठे यांसारखे रोजच्या वापरातील खाद्यपदार्थ पूर्वीप्रमाणेच करमुक्त राहतील.

५% स्लॅब : इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) यावर आधीपासूनच ५% जीएसटी लागू आहे, तोच दर कायम राहणार आहे.

३% स्लॅब : सोने, चांदी, हिरे व इतर मौल्यवान खड्यावरील करदर ३% कायम ठेवण्यात आला आहे.

१८% स्लॅब : मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील GST मध्ये कोणताही बदल नाही.

२८% स्लॅब + Compensation Cess : सिगारेट, तंबाखू उत्पादने, गुटखा, पान मसाला यांसारख्या ‘लक्झरी’ व ‘सिन गुड्स’वरील विद्यमान करदर कायम ठेवण्यात आला आहे. भविष्यात हा कर ४०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, मात्र सध्या बदल झालेला नाही.

तज्ज्ञांच्या मते, या कपातीमुळे गृहउपयोगी वस्तू व वाहनांच्या विक्रीत वाढ होऊ शकते, तर स्थिर ठेवलेल्या लक्झरी व तंबाखू वस्तूंवरून सरकारचा महसूल अबाधित राहील.

logo
marathi.freepressjournal.in