NIA ची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन रहिवाशांना अटक

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) या प्रकरणात मोठी कारवाई करत, हल्ल्याला मदत करणाऱ्या दोन पहलगामी स्थानिक रहिवाशांना अटक केली आहे.
NIA ची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन रहिवाशांना अटक
Published on

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) या प्रकरणात मोठी कारवाई करत, हल्ल्याला मदत करणाऱ्या दोन पहलगामी स्थानिक रहिवाशांना अटक केली आहे. पहलगाममधील या भ्याड हल्ल्यात एकूण पाच दहशतवादी सहभागी होते. त्यापैकी तीन दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून ते लष्कर-ए-तोयबा या भारतात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षित सदस्य होते असे तपासामध्ये उघड झाले आहे.

हल्लेखोरांना आश्रय व मदत करणारे स्थानिक जाळ्यात -

एनआयएने परवेझ अहमद जोथर (रा. बटकोट, पहलगाम) आणि बशीर अहमद जोथर (रा. हिल पार्क, पहलगाम) या दोन काश्मिरी नागरिकांना अटक केली आहे. त्यांनी हल्ल्याच्या आधी दहशतवाद्यांना जाणूनबुजून आश्रय, अन्न आणि लॉजिस्टिक मदत पुरवली होती. या आधारावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ल्यापूर्वी झोपडीतून तयारी

तपासादरम्यान हेही समोर आले आहे की, हल्ल्याच्या काही दिवस आधी परवेझ आणि बशीर यांनी या तिघा दहशतवाद्यांना हिल पार्क परिसरातील एका दुर्गम झोपडीत आश्रय दिला होता. त्यांनी त्यांना अन्न, निवारा आणि सुरक्षिततेची व्यवस्था करून दिली होती.

तीन दहशतवादी पाकिस्तानी -

NIA ने दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान अटक केलेल्या स्थानिकांनी कबुली दिली, की हल्ल्यात सहभागी असलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून ते लष्कर-ए-तोयबा (LeT) या भारतात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.

logo
marathi.freepressjournal.in