पत्नी निक्कीला जाळणारा विपिन चकमकीत जखमी; पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्न

ग्रेटर नोएडामध्ये निक्की हत्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निक्कीचा पती विपिन याचा दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याला जखमी अवस्थेत पकडले आहे.
पत्नी निक्कीला जाळणारा विपिन चकमकीत जखमी; पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्न
Published on

ग्रेटर नोएडामध्ये निक्की हत्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निक्कीचा पती विपिन याचा दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याला जखमी अवस्थेत पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असताना विपिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मेडिकलसाठी नेताना त्याने गाडीतून उडी मारली आणि पोलिसांचं शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली. गोळी विपिनच्या पायावर लागली आणि तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

३६ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळलं

२१ ऑगस्ट रोजी विपिनने आपल्या आईच्या मदतीने पत्नी निक्कीला घरातच जिवंत जाळलं होतं. हा प्रकार निक्कीच्या लहान मुलासमोर घडला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात मुलगा म्हणताना दिसतो की “पप्पांनी आईला लायटरने जाळलं.”

निक्की गंभीर जखमी अवस्थेत असताना शेजाऱ्यांनी तिला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान निक्कीचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांचा आक्रोश

घटनेनंतर निक्कीची बहीण कांचन हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच निक्कीच्या कुटुंबीयांनी कसना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणात विपिनसोबतच त्याची आई, वडील आणि भावाला पोलिसांनी आरोपी ठरवलं आहे.

२०१६ मध्ये झाला होता विवाह

निक्की आणि विपिनचा विवाह डिसेंबर २०१६ मध्ये झाला होता. विवाहानंतर सतत हुंड्याच्या मागण्या आणि छळामुळे अखेर निक्कीचा जीव गेला.

logo
marathi.freepressjournal.in