ISI शी संबंधित नऊ संशयितांना अटक

दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने (विशेष शाखा) शनिवारी एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला.
ISI शी संबंधित नऊ संशयितांना अटक
ISI शी संबंधित नऊ संशयितांना अटक
Published on

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने (विशेष शाखा) शनिवारी एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय' आणि मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या ९ संशयित हस्तकांना पोलिसांनी अटक केली आहे. हे संशयित देशाच्या राजधानीत महत्त्वाच्या वास्तू आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्याची योजना आखत होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली. कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

ISI शी संबंधित नऊ संशयितांना अटक
मुंबईत चिनी बनावटीची शस्त्रे जप्त; तीन तस्करांना अटक

दीर्घ तपास आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हे नऊ जण पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या हँडलर्सच्या (सूत्रधार) इशाऱ्यावर काम करत होते. दिल्लीतील अत्यंत संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in