"तुम्ही आमच्या पैशावर जगताय; हिंमत असेल तर बिहारला या, उचलून आपटू"; भाजप खासदाराने तोडले अकलेचे तारे; ठाकरेंनाही डिवचलं

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देशभरातून लाखो लोक रोजगार, शिक्षण आणि सुखी आयुष्याच्या शोधात येतात. मात्र, आता हिच मुंबई आणि मराठी माणूस भाजप खासदाराच्या विषारी टीकेचा विषय बनली आहे. झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबईतल्या भाषिक वादात उगाच उडी घेत, केवळ राज ठाकरे, उद्धव ठाकरे नव्हे तर संपूर्ण मराठी समाजाला डिवचणारे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
"तुम्ही आमच्या पैशावर जगताय; हिंमत असेल तर बिहारला या, उचलून आपटू"; भाजप खासदाराने तोडले अकलेचे तारे; ठाकरेंनाही डिवचलं
Published on

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देशभरातून लाखो लोक रोजगार, शिक्षण आणि सुखी आयुष्याच्या शोधात येतात. मात्र, आता हिच मुंबई आणि मराठी माणूस भाजप खासदाराच्या विषारी टीकेचा विषय बनली आहे. झारखंड भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबईतल्या भाषिक वादात उगाच उडी घेत, केवळ राज ठाकरे, उद्धव ठाकरे नव्हे तर संपूर्ण मराठी समाजाला डिवचणारे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

राज ठाकरे यांना आव्हान -

वरळी येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथे एका व्यापाऱ्यावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "मारहाण करताना त्याचा व्हिडीओ काढू नका." या विधानाचा संदर्भ घेऊन निशिकांत दुबे यांनी थेट राज ठाकरे यांना आव्हान देत म्हटलं, “बिहार, यूपी किंवा तामिळनाडूमध्ये येऊन बघा, उचलून आपटू.”

मराठी माणसांविषयी अपमानास्पद भाषा -

याच वक्तव्यात दुबे यांनी मराठी माणसांविषयी अत्यंत अपमानास्पद भाषा वापरत पुढे म्हटलं, "तुम्ही कोणाची भाकरी खाताय? मुंबईत टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणतेही महाराष्ट्राचे युनिट नाही. टॅक्स देणारे बिहार झारखंड नाहीये का? टाटाने तर पहिली फॅक्टरी बनवली. आमच्या पैशांवर तुम्ही जगत आहात. तुमच्याकडे कोणती Industry आहे? Mines आमच्याकडे आहे. झारखंडकडे आहे. छत्तीसगडकडे आहे, मध्यप्रदेशांत आहे, ओडिसामध्ये आहे. तुमच्याकडे कोणती Mines आहे? रिफायनरी रिलायन्सने बसवली आहे ती पण गुजरातमध्ये आहे. सेमीकंडक्टर इंडस्ट्री गुजरातमध्ये आहे. वरती तुम्ही आमचं शोषण करून टॅक्स भरताय. जर तुमच्यात जास्त हिंमत आहे, तर तुम्ही हिंदी भाषिकाला मारताय तर उर्दू भाषिकाला मारा. तमिळ आणि तेलगू बोलणाऱ्यांना पण मारा. जर तुम्ही आपल्या घरात, महाराष्ट्रात बॉस आहात तर चला बिहारमध्ये, चला उत्तर प्रदेश, चला तमिळनाडूमध्ये. तुम्हाला उचलून आपटू.''

पुढे म्हणाले, की ''बीएमसी निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच राज आणि उद्धव हे हलक्या दर्जाचे राजकारण करत आहेत. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमला जाऊन माहीम दर्ग्यासमोर कोणत्याही उर्दू भाषिक व्यक्तीला मारहाण करावी. तेव्हा आम्ही समजू की हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पालन करतात.''

महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाव -

निशिकांत दुबेंनी केवळ राज किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरच नाही तर मुंबई आणि मराठी समाजावर गरळ ओकली आहे. ''तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात'' हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाव घातला आहे. त्यामुळेच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादग्रस्त वक्तव्यावर महाराष्ट्रात विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in