आता टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड असणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१९मध्ये पेटीएमसोबतचे टायटल प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढविले होते
आता टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड असणार

टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर म्हणून ‘पेटीएम’ची जागा आता ‘मास्टरकार्ड’ने घेतली आहे. आता भारतात होणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१९मध्ये पेटीएमसोबतचे टायटल प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढविले होते, त्यानंतर एका सामन्यासाठी ३,८० कोटी रुपयांचा सौदा निश्चित करण्यात आला, त्यापूर्वी ही रक्कम २.४ कोटी रुपये इतकी होती; परंतु २०२२मध्येच पेटीएमने हा करार तोडला.

टीम इंडिया सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजचा दौरा आटोपून झिम्बाब्वेला जाणार आहे. तेथे टीम इंडिया १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. देशांतर्गत दौऱ्यावर मास्टरकार्डच शीर्षक प्रायोजक असणार आहे.

इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तात म्हटले आहे की, पेटीएमने यापुढे सामन्यांचे शीर्षक प्रायोजक म्हणून चालू ठेवू इच्छित नसल्याचे जुलैच्या सुरुवातीला बीसीसीआयला सांगितले होते. त्यांनी हे अधिकार मास्टरकार्डकडे सोपवण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पेटीएमसोबत झालेल्या कराराच्या आधारे हे अधिकार मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले. आता मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी ३.८ कोटी रुपये देणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in