दहा लाख टन तांदूळ बंदरांवर अडकला; खरेदीदारांचा अतिरिक्त शुल्क भरण्यास नकार

दहा लाख टन तांदूळ बंदरांवर अडकला; खरेदीदारांचा अतिरिक्त शुल्क भरण्यास नकार

सरकारने अलीकडेच निर्यातीवर बंदी आणली होती तसेच २० टक्के अतिरिक्त शुल्क भरले होते.
Published on

सरकारने तुकडा तांदूळ निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने निर्यातदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. विदेशी तांदूळ खरेदीदारांनी अतिरिक्त शुल्क भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दहा लाख टन तांदूळ बंदरांवर अडकून पडला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या किमती वाढू नयेत यासाठी सरकारने अलीकडेच निर्यातीवर बंदी आणली होती तसेच २० टक्के अतिरिक्त शुल्क भरले होते.

राईस एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्णा राव म्हणाले की, सरकारने तात्काळ प्रभावाने शुल्क लागू केले; परंतु खरेदीदार त्यासाठी तयार नाहीत. सध्या आम्ही तांदूळ पाठवणे थांबवले आहे. जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारताने बंदी घातल्यानंतर आता शेजारील देशांसह जगातील तांदूळ आयात करणाऱ्या देशांच्या अडचणी वाढू शकतात.

भारतातून दर महिन्याला सुमारे वीस लाख टन तांदूळ निर्यात होतो. यामध्ये सर्वाधिक लोडिंग आंध्र प्रदेशातील कनिकाडा आणि विशाखापट्टन बंदरांमधून होते. बंदरांवर अडकलेला तांदूळ चीन, सेनेगल, संयुक्त अरब अमिराती आणि तुर्कीमध्ये निर्यात केला जाणार होता. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा तुकडा तांदळाचा असतो.

logo
marathi.freepressjournal.in