केरळमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट एक जण ठार, १६ जण जखमी

केरळमधील एका फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याने त्यात एक जण ठार तर १६ जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.
केरळमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट एक जण ठार, १६ जण जखमी

त्रिपुनिथुरा : केरळमधील एका फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याने त्यात एक जण ठार तर १६ जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवाशी भागात झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विष्णू असे मृत व्यक्तीचे नाव असून तो तिरुवनंतपुरम येथील राहणारा आहे. दरम्यान फटाका फॅक्टरीत झालेला स्फोट इतका भीषण होता की, या फॅक्टरीच्या आसपासची २५ घरे जमीनदोस्त झाली. तर दोन वाहने जळून खाक झाली आहेत.

दरम्यान फॅक्टरीमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस आणि अग्रिशमन दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फटाका फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट भीषण होता. स्फोटाचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती अग्मिमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. स्फोट झाल्यानंतर आगीने भडका घेतला होता, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी आग शमवली आहे. दरम्यान फटाका फॅक्टरी अवैध पद्धतीने चालवण्यात येत होते, याची माहिती पोलिसांनी नव्हती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in