"कुत्र्यासारखा शेपूट घालून पळाला पाकिस्तान"; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने काढले वाभाडे, भारताचं कौतुक

अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या अचूक हल्ल्यांचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांच्या मते, भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे अत्यंत कठीण झाले आणि अखेर पाकिस्तानची अवस्था ‘शेपूट घालून पळणाऱ्या कुत्र्यासारखी’ झाली.
"कुत्र्यासारखा शेपूट घालून पळाला पाकिस्तान"; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने काढले वाभाडे, भारताचं कौतुक
Published on

नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या अचूक हल्ल्यांचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांच्या मते, भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे अत्यंत कठीण झाले आणि अखेर पाकिस्तानची अवस्था ‘शेपूट घालून पळणाऱ्या कुत्र्यासारखी’ झाली.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रुबिन म्हणाले, “भारताने दहशतवादी ठिकाणांना अचूक लक्ष्य केले आणि पाकिस्तानच्या संभाव्य प्रत्युत्तराचा मार्ग यशस्वीपणे बंद केला. भारताने पाकिस्तानची हवाई तळे निष्क्रिय केली, त्यानंतर घाबरलेला पाकिस्तान युद्धबंदीसाठी शरण आला”. त्यांनी स्पष्ट केले की इस्लामाबादला हे कबूल करावे लागेल की तो फारच लाजीरवाण्या प्रकारे पराभूत झाला आहे.

रुबिन यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप करत सांगितले की, “दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा सहभाग हेच दाखवते की आयएसआय, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी यामध्ये फरक नाही.”

"हा संघर्ष भारताला हवा होता असे नाही. हा संघर्ष भारतावर पाकिस्तानकडून लादला गेला. प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. भारताने आता पाकिस्तानला एक सीमारेखा आखत स्पष्ट केले कि आता सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे भारताने जे करणे आवश्यक होते ते केले."

इतिहास अभ्यासक असलेल्या रुबिनच्या मते, “पाकिस्तानने भारताविरुद्ध अनेक वेळा युद्धे सुरू केली, पण प्रत्येक वेळी स्वतःला विजेता असल्याचा आभास देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक दोन्ही आघाड्यांवर विजय मिळवला आहे.”

पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला, “सेनाप्रमुख असीम मुनीर हे या कठीण परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडू शकतील का? की त्यांचा अहंकार पाकिस्तानच्या भविष्यात मोठा अडथळा ठरेल?” रुबिन यांनी पाकिस्तानच्या लष्कराला ‘कर्करोग’ असेही म्हटले आहे.

रुबिन यांनी भारताने पाकिस्तानच्या प्रारंभिक प्रत्युत्तराला कसे निष्प्रभ केले याचा तपशील दिला. “भारताने अत्यंत अचूकतेने दहशतवादी मुख्यालये आणि प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त केली. जेव्हा पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताच्या प्रबळ रणनीतीमुळे त्यांच्या हवाई क्षमतेला मोठा धक्का लागला.”

रुबिन यांच्या या वक्तव्यांमुळे भारताच्या दहशतवादविरोधी भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकट होण्याची शक्यता वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in