गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

पाटण्यात गस्तीवर असलेल्या 'पोलीस दीदी' आणि तरुणामधील वादाचा VIDEO व्हायरल झाला आहे. महिला पोलिसाने थप्पड लगावल्यानंतर तरुणानेही हात उचलल्याचा आरोप असून, पोलिसांनी २२ वर्षीय प्रदीप कुमारला अटक केली आहे.
गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO
गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO
Published on: 

बिहारमधील पाटण्यात महिला पोलिस कर्मचारी आणि तरुणामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गस्तीदरम्यान महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला महिला पोलिसाने थप्पड लगावली. त्यानंतर संबंधित तरुणानेही महिला पोलिसाला मारल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तीन तरुण तेथून पळून गेले. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी २२ वर्षीय प्रदीप कुमार याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे.

ही घटना बुधवारी (दि ३०) सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घडल्याचे सांगितले जाते. त्यावेळी ‘पोलीस दीदी’ पथक परिसरात गस्त घालत होते.

नेमकं काय घडलं?

गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली दिसल्याने महिला पोलिसांच्या पथकाने तीन तरुणांना थांबवले. यावेळी प्रदीप कुमार नावाच्या तरुणाने महिला पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिला पोलीस आणि तीन तरुणांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे दिसते. याचदरम्यान एका महिला पोलिसाने प्रदीपला थप्पड लगावली. त्यानंतर प्रदीपनेही महिला पोलिसाला मारल्याचा आरोप आहे. जवळपास एक मिनिट हा वाद सुरू होता. त्यानंतर तिन्ही तरुण तेथून पळून गेले.

व्हायरल व्हिडिओ पाहा

CCTVमुळे आरोपीचा लागला शोध

घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही तरुणांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याआधारे पोलिसांनी २२ वर्षीय प्रदीप कुमारचा शोध घेत त्याला अटक केली. या प्रकरणातील इतर दोन तरुणांचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नेमका वाद कशामुळे सुरू झाला आणि त्यावेळी काय घडले, याचाही पुढील तपास केला जात आहे.

‘पोलीस दीदी’ म्हणजे काय?

महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘पोलीस दीदी’ हा उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत महिला पोलिस कर्मचाऱ्यांची शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरात नियुक्ती केली जाते. महिला आणि मुलींच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारी किंवा घटनांवर तातडीने लक्ष देणे हा या पथकाचा उद्देश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in