

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँकेचा (PPBL) बँकिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय जाहीर करत बँकेचे कामकाज कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आणि मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे स्पष्ट केले. या घडामोडीनंतर भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड) ने मात्र आरबीआयच्या या कारवाईचा आपल्या आर्थिक किंवा व्यावसायिक कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगत गुंतवणूकदारांना दिलासा दिला.
PPBL आणि Paytm या स्वतंत्र संस्था
पेटीएमने स्पष्ट केले की, Paytm Payments Bank ही स्वतंत्र संस्था आहे आणि तिच्या दैनंदिन कामकाजात, व्यवस्थापनात किंवा संचालक मंडळाच्या निर्णयांमध्ये पेटीएमची थेट भूमिका नाही.
कंपनीने सांगितले की, १ मार्च २०२४ रोजी दिलेल्या माहितीनुसार पेटीएमचा PPBLसोबत कोणताही महत्त्वाचा आर्थिक व्यवहार किंवा व्यावसायिक करार नाही.
आर्थिक फटका बसणार नाही, कंपनीचा दावा
पेटीएमने म्हटले आहे की, ३१ मार्च २०२४ रोजीच कंपनीने PPBLमधील गुंतवणुकीचे मूल्य कमी (Impair) करून नोंदवले होते. त्यामुळे RBIच्या कारवाईचा कंपनीवर थेट आर्थिक फटका बसणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
पेटीएमच्या सर्व सेवा सुरळीत सुरू
कंपनीने स्पष्ट केले की, पेटीएम ॲप आणि त्याच्या सर्व प्रमुख सेवा सध्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहेत.
यामध्ये पुढील सेवांचा समावेश आहे:
Paytm UPI
Paytm Gold
Paytm QR
Paytm Soundbox
Paytm कार्ड मशीन
Paytm Payment Gateway
Paytm Money
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सेवा PPBLशी थेट संबंधित नसून नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
RBIची कारवाई फक्त PPBLपुरतीच
पेटीएमने स्पष्ट केले की, RBIची कारवाई केवळ Paytm Payments Bankपुरती मर्यादित आहे. त्यामुळे या प्रकरणाचा थेट संबंध पेटीएमच्या मुख्य व्यवसायाशी जोडू नये, असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचा नफा
गेल्या काही वर्षांत पेटीएमने आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित केले असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सलग तीन तिमाहींमध्ये कंपनीने नफा नोंदवला आहे.
कंपनीने ५५९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (PAT) जाहीर केला. Paytm First Games या संयुक्त उपक्रमाशी संबंधित १९० कोटी रुपयांचा एकवेळ खर्च वगळल्यानंतरही कंपनीचा नफा ३६९ कोटी रुपये राहि
UPI व्यवहारात मोठी वाढ
Paytm UPIने सलग तिसऱ्या तिमाहीत बाजारातील हिस्सा वाढवला आहे. कंपनीच्या ग्राहक UPI व्यवहार मूल्यात (GMV) गेल्या नऊ महिन्यांत ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तुलनेत, याच कालावधीत उद्योगाची सरासरी वाढ १६ टक्के होती.
विश्लेषकांचा सकारात्मक अंदाज
काही ब्रोकरेज संस्थांनी पेटीएमकडे मजबूत नफा क्षमता असलेल्या फिनटेक (Fintech) कंपन्यांपैकी एक म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.
व्यापारी पेमेंट्स (Merchant Payments) आणि वित्तीय सेवा (Financial Services) क्षेत्रातील वाढत्या उत्पन्नामुळे कंपनीची कमाई आणि नफा क्षमता आणखी मजबूत होत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.