कुत्र्याला 'इमानी' का म्हणतात? हा VIDEO पाहिल्यावर कळेल; मालकाला वाचवण्यासाठी विषारी सापाशी भिडला, अन् शेवटी...

कुत्र्याला 'इमानी' का म्हणतात, याचं उत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुटुंबीयांना वाचवण्यासाठी पाळीव कुत्र्याने विषारी सापाशी झुंज देत कुटुंबीयांचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
कुत्र्याला 'इमानी' का म्हणतात? हा VIDEO पाहिल्यावर कळेल; मालकाला वाचवण्यासाठी विषारी सापाशी भिडला, अन् शेवटी...
Published on

"कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी असतो," हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. पण असं का म्हणतात हे उत्तर प्रदेशातील एका पाळीव कुत्र्याने हे अक्षरशः खरं करून दाखवलं आहे. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना एका विषारी सापाने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, 'टॉमी' नावाच्या पाळीव कुत्र्याने स्वतःचा जीव धोक्यात घालत तब्बल तासभर त्या सापाशी झुंज दिली. अखेर सापाला ठार केलं, पण या लढाईत त्यालाच विषारी दंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, टॉमीच्या निष्ठेचे नेटकरी कौतुक करत आहेत.

नेमकं काय घडलं?

ही घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात घडली. रविवारी (दि. ०२) पहाटे सुमारे दोनच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण झोपलेले असताना एक विषारी साप घराकडे सरकत होता. घरातील कोणाच्याही आधी नऊ वर्षांच्या टॉमीला या धोक्याची चाहूल लागली. त्याने जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून कुटुंबीय जागे झाले. मात्र, तोपर्यंत टॉमीने साप आणि घराच्या प्रवेशद्वारामध्ये स्वतःला उभं केलं होतं.

तासभर सापाशी झुंज

साप घरात घुसू नये म्हणून टॉमीने त्याच्यावर हल्ला चढवला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, जवळपास एक तास ही झुंज सुरू होती. अखेर टॉमीने सापाला ठार केलं. मात्र, या दरम्यान विषारी सापाने टॉमीला दंश केला. सापाचा धोका दूर करण्यात तो यशस्वी झाला, पण विषाचा परिणाम त्याच्यावर झाला. काही वेळातच तो कोसळला आणि सुमारे तासाभरानंतर त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबासाठी तो फक्त पाळीव कुत्रा नव्हता...

टॉमी गेली नऊ वर्षे या कुटुंबासोबत राहत होता. घराची राखण करणं ही त्याची रोजची सवय होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, "त्या रात्री टॉमीने सापाला अडवलं नसतं, तर तो घरात शिरला असता आणि एखाद्या व्यक्तीचा जीवही गेला असता."

कुत्र्याला 'इमानी' का म्हणतात? हा VIDEO पाहिल्यावर कळेल; मालकाला वाचवण्यासाठी विषारी सापाशी भिडला, अन् शेवटी...
VIDEO : पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं, पतीने भररस्त्यात पट्टा काढला अन्...

भावनिक निरोप...

टॉमीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अत्यंत भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार केले. परिसरातील नागरिकांनीही त्याला श्रद्धांजली वाहत त्याच्या धाडसाचं कौतुक केलं.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी "खऱ्या अर्थाने इमानी मित्र", "स्वतःचा जीव देऊन कुटुंब वाचवलं", "अशा निष्ठेला सलाम" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in