Odisha Rath Yatra tragedy : पुरीच्या जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी, १ ठार

ओदिशातील पुरी येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवादरम्यान भाविकांच्या अचानक उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण होऊन त्यामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला, तर सुमारे १०० जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
Odisha Rath Yatra tragedy : पुरीच्या जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी, १ ठार
Odisha Rath Yatra tragedy : पुरीच्या जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी, १ ठार(Photo-X)
Published on

पुरी : ओदिशातील पुरी येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवादरम्यान भाविकांच्या अचानक उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण होऊन त्यामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला, तर सुमारे १०० जण जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, याच गर्दीत हृदयविकाराचा झटका आल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, मात्र या घटनेचा चेंगराचेंगरीशी थेट संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वार्षिक रथयात्रा महोत्सवासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. सध्या भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ या तिन्ही भावंडांची पारंपरिक मिरवणूक म्हणजेच 'पहांडी' विधी सुरू आहे. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in