राम मंदिर देणगी घोटाळा : अयोध्या देणग्यांचा चोरलेला पैसा शेअर बाजारात

राम मंदिर दानपेटीतील चोरीचे पैसे आरोपींनी शेअर बाजारात गुंतवल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
राम मंदिर देणगी घोटाळा : अयोध्या देणग्यांचा चोरलेला पैसा शेअर बाजारात
राम मंदिर देणगी घोटाळा : अयोध्या देणग्यांचा चोरलेला पैसा शेअर बाजारात(संग्रहित छायाचित्र)
Published on

अयोध्या : राम मंदिर दानपेटीतील चोरीचे पैसे आरोपींनी शेअर बाजारात गुंतवल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. राम मंदिरात देणग्या मोजणाऱ्या अविनाश शुक्ला आणि अनुकल्प मिश्रा या आरोपींनी मंदिरातील चोरीची रोकड शेअर मार्केटमध्ये तसेच नातेवाईकांच्या बँक खात्यात गुंतवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी या घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या नातेवाईकांची तब्बल ३० बँक खाती गोठवली असून पुढील कसून तपास करत आहेत. त्याचप्रमाणे आरोपींच्या घरातून नोंटाचे बंडलही मिळाल्याचे वृत्त आहे. या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यभरात राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राम मंदिर देणगी घोटाळा : अयोध्या देणग्यांचा चोरलेला पैसा शेअर बाजारात
राम मंदिर देणगी घोटाळा : अटक केलेल्यांमध्ये प्राथमिक शिक्षक, मेकॅनिक, निवृत्त बँक कर्मचारी

९९ टक्के भाजपवाले?

लखनऊ : अयोध्या राम मंदिरात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या 'कॉल डिटेल रेकॉर्ड्स'ची सखोल चौकशी करण्यात यावी," अशी मागणी गुरुवारी अखिलेश यादव यांनी केली. या चौकशीत ९९.९ टक्के कर्मचाऱ्यांचे थेट भाजपशी कनेक्शन उघड होईल असा दावाही त्यांनी केला.

‘बद्रीनाथ’मध्ये कारवाई

दरम्यान, बद्रीनाथ धामच्या देणग्यांमध्ये हेराफेरी प्रकरणात पहिली मोठी फौजदारी कारवाई झाली आहे. मंदिर अधिकारी युद्धवीर पुष्पवान यांच्या तक्रारीवरून, निलंबित खाजगी सचिव प्रमोद नौटियाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. समितीला १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे गोहत्येसारखे पाप आहे, असे धामी म्हणाले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in