RBI ने कर्जमाफीबाबत जारी केला अलर्ट!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) गेल्या काही आठवड्यांपासून ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांबाबत सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहे.
RBI ने कर्जमाफीबाबत जारी केला अलर्ट!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) गेल्या काही आठवड्यांपासून ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांबाबत सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहे. आता आरबीआयने कर्जमाफीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल अलर्ट जारी केला आहे. प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कर्जमाफीच्या ऑफरशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन आरबीआयने सोमवारी केले.

एका निवेदनात, आरबीआयने म्हटले आहे की, कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या काही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. काही संस्था प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा अनेक जाहिरातींचा सक्रियपणे प्रचार करत आहेत. अशा संस्थांशी संबंध ठेवल्यास थेट आर्थिक नुकसान होऊ शकते. या संस्था कोणत्याही अधिकाराशिवाय 'कर्जमाफी प्रमाणपत्रे' जारी करण्याचा दावा करत त्यासाठी सेवा/कायदेशीर शुल्क आकारत असल्याचेही समजले आहे. काही ठिकाणी, काही लोकांकडून कर्जमाफीच्या ऑफरशी संबंधित मोहिमा चालवल्या जात आहेत. अशा संस्था बँकांसह वित्तीय संस्थांची थकबाकी फेडण्याची गरज नाही असे चुकीचे लोकांना सांगत आहेत. त्यामुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठेवीदारांचे हित कमकुवत होते," असे आरबीआयने म्हटले आणि अशा खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या मोहिमांना बळी पडू नये आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना अशा घटनांची तक्रार करावी, असे आवाहन लोकांना केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in