Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (दि. १०) झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधारावर सुरक्षा दलांनी गुरुवारी (दि. १३) रात्री कठोर कारवाई केली. दहशतवादी डॉ. उमर नबीचे घर IED वापरून उडवण्यात आले. या कारवाईत त्याचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे.
Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले
Published on

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (दि. १०) झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधारावर सुरक्षा दलांनी गुरुवारी (दि. १३) रात्री कठोर कारवाई केली. हल्ल्यातील मास्टरमाईंड दहशतवादी उमर नबीचे घर IED वापरून उडवण्यात आले. या कारवाईत त्याचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे. ही कारवाई करून सुरक्षा दलाने दहशतवादाविरोधी कठोर संदेश दिला आहे.

मुख्य सूत्रधार उमर असल्याची खात्री

दिल्ली आत्मघाती हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. हल्ल्यातील कारमध्ये अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळले होते. तर अनेक सिसिटीव्ही फुटेजमध्ये उमर कार चालवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारमधील मृत अज्ञात व्यक्ती हा उमर असल्याचा संशय होता. त्यासाठी त्याच्या आईची DNA टेस्ट करण्यात आली. अखेर DNA टेस्ट १०० टक्के जुळली आणि उमरनेच हा हल्ला केल्याची खात्री झाली. त्यानंतर सुरक्षा दलाने त्याचे घर उडवून मोठी कारवाई केली आहे.

या हल्ल्यात 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल' उघडकीस आले असून या कटात अनेक उच्चशिक्षित डॉक्टर सहभागी होते. आतापर्यंत मुजम्मिल अहमद, शाहीन शाहिद, आदिल या डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

फरिदाबादमध्ये संशयित कार

गुरुवारी फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये आणखी एक संशयित मारुती ब्रेझा कार आढळली. ही कार अटक केलेल्या शाहीन शाहिदच्या नावावर नोंदणीकृत होती. तपासात असे दिसून आले की, दहशतवाद्यांनी आयईडीसाठी एकूण तीन कार खरेदी केल्या होत्या, आणि त्यातील लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार फरिदाबादच्या खंडावली गावातून पोलिसांनी ताब्यात घेतली.

ॲपद्वारे दहशतवादी योजना

तपासात हेही समोर आले की, उमर मोहम्मद, मुजम्मिल अहमद आणि शाहीन शाहिद यांनी संपूर्ण दहशतवादी मोहिमेची योजना एन्क्रिप्टेड स्विस मेसेजिंग ॲपद्वारे बनवली आणि त्याच ॲपद्वारे संवाद साधला.

खत व बियाणे विक्रेता ताब्यात

हरियाणातील नूंह येथे पिनांगवा येथील एका खत व बियाणे विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी या दुकानातून मोठ्या प्रमाणात एनपीके खत खरेदी केल्याचा संशय आहे, जे आयईडीसाठी वापरण्यात आले असावे.

दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमावर्ती भागात अलर्ट जारी केला आहे. फरीदाबादमधील या दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांशी जोडले गेले असल्याची शक्यता तपासात आल्याने पोलिस सर्व दिशेने तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in