पाकमधून आलेल्या सीमा हैदरने मुलाचे नाव ठेवले ‘भारत’; डोक्यावर कलश ठेवून विहिरीची केली पूजा, म्हणतेय - हिंदू असल्याचा अभिमान, VIDEO

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरने आपल्या मुलाचे नाव 'भारत' ठेवले आहे. नोएडातील रबुपुरा येथील घरी गुरुवारी मुलाचा नामकरण सोहळा पार पडला.
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने मुलाचे नाव ठेवले ‘भारत’, VIDEO
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने मुलाचे नाव ठेवले ‘भारत’, VIDEO
Published on

नोएडा : पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरने आपल्या मुलाचे नाव 'भारत' ठेवले आहे. नोएडातील रबुपुरा येथील घरी गुरुवारी मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. नामकरण संस्कारापूर्वी सीमाने जागरण केले. त्यानंतर विहीर पूजन केले. डीजेच्या तालावर नाचत-गाजत मोहल्ल्यातील महिला पूजेसाठी निघाल्या. घरीही संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पूजेनंतर घरी परत येत असताना सीमाने पत्रकारांशी संवाद साधला.

सीमा हैदर म्हणाली, ‘माझ्या मुलाचा नामकरण सोहळा होता. घरी जागरणही केले. हिंदू धर्मात जेव्हा घरात मुलगा होतो, तेव्हा नामकरण केले जाते. खूप छान वाटत आहे. हा खूप आनंदाचा क्षण आहे. हे दुसरे विहीर पूजन आहे, यापूर्वी जेव्हा मीरा झाली होती, तेव्हा केले होते. हिंदू धर्म खूप सुंदर आहे. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. मी क्रिकेट मॅचमध्ये भारताला सपोर्ट करते. भारत जेव्हा मॅच जिंकतो, तेव्हा मला आनंद होतो. मॅचदरम्यान मी देवाला प्रार्थना करते की भारताचाच विजय व्हावा. भारताचे लोक खूप चांगले आहेत. मला परत पाकिस्तानला जायचे नाही. रबुपुरात प्रत्येक जातीचे लोक राहतात. ते मला प्रेम देतात, आदर देतात. ते मला त्यांची सून मानतात’.

सीमा हैदरच्या सहाव्या मुलाचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. तिने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी नोएडा येथील एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला होता. यापूर्वी तिने एका मुलीलाही जन्म दिला होता. सीमाला तिच्या पाकिस्तानी पूर्व पतीपासून चार मुले आहेत, तर भारतीय पती सचिन मीनापासून तिला २ मुले आहेत. सीमा, पाकिस्तान सोडून चार वर्षांपूर्वी तिचा प्रियकर सचिनकडे आली होती. मुलाच्या नामकरण संस्कारावेळी घरात आनंदाचे वातावरण होते.

सीमा हैदर म्हणाली, पंडितजींनी जेव्हा नावासाठी अक्षर सुचविले तेव्हा ते 'भ' आले. आम्ही खूप वेळ विचार केला. त्यानंतर ‘भारत’ हे नाव ठेवले. भारतापेक्षा सुंदर नाव दुसरे कोणतेही असूच शकत नाही. पाकिस्तानमधून भारतात येऊन मी खूप आनंदी आहे. येथे येऊन खूप छान वाटते. मला पाकिस्तान सोडल्याचा कधीही पश्चात्ताप होत नाही. सीमा हैदर आणि पती सचिन मीणा यांना ६ मुले आहेत. त्यापैकी ४ मुले ही पाकिस्तानी पतीपासून झालेली आहेत. यूट्यूब चॅनलवर सीमाचे २ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

पब्जी गेममुळे प्रेम

पाकिस्तानमध्ये सीमा हैदर आणि गुलाम हैदरचा निकाह २०१४ मध्ये झाला होता. सीमा आणि चार मुलांना कराचीमध्ये सोडून गुलाम हैदर हा २०१९ मध्ये दुबईला गेला. यादरम्यान २०१९ मध्येच पब्जी खेळता-खेळता सीमाची नोएडाच्या रबुपुरा येथील रहिवासी सचिन मीणासोबत ऑनलाइन भेट झाली. १० मार्च २०२३ रोजी नेपाळमध्ये सीमा आणि सचिनची समोरासमोर भेट झाली. तिथेच त्यांनी एका मंदिरात धर्म परिवर्तन करून लग्न केल्याचा दावा केला. नेपाळमधून सीमा पाकिस्तानला परत गेली.

सोशल मीडियावर जोडपे खूप सक्रिय

सीमा तिचा पती सचिनसोबत व्हिडीओ बनवते. तिच्या चॅनलवर २ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. सीमा हैदर २०२३ पासून नोएडाच्या रबुपुरा येथे सचिन मीणासोबत राहत आहे. या दोघांची कहाणी यापूर्वीही बरीच चर्चेत राहिली आहे. हे जोडपे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्यांच्या यूट्यूब चॅनलला २ दशलक्षहून अधिक लोक पाहतात.

पाकमधून आलेल्या सीमा हैदरने मुलाचे नाव ठेवले ‘भारत’, VIDEO
'एक फुल, दो माली'ची अनोखी प्रेमकथा; एका तरुणीवर दोन पतींचा दावा, प्रकरण गेले वेगवेगळ्या हायकोर्टात

हरयाणातून सचिन-सीमा यांना ताब्यात घेण्यात आले होते

यानंतर दोघे घरातून पळून गेले. ३ जुलै रोजी सीमा-सचिनला हरयाणातील बल्लभगढ येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ४ जुलै २०२३ रोजी सचिनचे वडील नेत्रपाल यांना अटक केली. ८ जुलै रोजी तिघांना कोर्टातून जामीन मिळाला. १७ आणि १८ जुलै रोजी एटीएसने सीमा-सचिनची चौकशी केली. २१ जुलै २०२३ रोजी सीमा आणि सचिनच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in