"आमचा पाठिंबा भाजपला नाही तर..."; नागालँडमधील पाठिंब्याबद्दल काय म्हणाले शरद पवार?

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याचे घोषित केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
"आमचा पाठिंबा भाजपला नाही तर..."; नागालँडमधील पाठिंब्याबद्दल काय म्हणाले शरद पवार?
Published on

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दर्शवला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. भाजपला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे टीका होऊ लागली. यावर आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

मोठी बातमी! नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी सोबत; एकत्र सत्तेत बसणार

पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "मला आश्चर्य वाटते की मेघालय आणि शेजारच्या राज्यात ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री दोघेही गेले होते. प्रधानमंत्र्यांनी मेघालयाच्या प्रचारामध्ये तेथील मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याची टीका केली. त्यांचा पराभव करा असे सांगितले. मात्र निवडूक झाल्यानंतर ते त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले, अशी भूमिका आम्ही घेतली नाही." असे मत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in