धक्कादायक: प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटकेत

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि स्थानिक पोलिसांनी मिळून हिसारमधील न्यू अग्रसेन एक्सटेंशन येथून तिला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ज्योतीसह तिच्या पाच सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
धक्कादायक: प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटकेत
Published on

हिसार : सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि स्थानिक पोलिसांनी मिळून हिसारमधील न्यू अग्रसेन एक्सटेंशन येथून तिला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ज्योतीसह तिच्या पाच सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

3.77 लाख सब्स्क्राइबर्स

ज्योती मल्होत्रा ‘Travel with Jo’ या नावाने युट्यूबवर प्रवासी व्हिडिओ बनवते. तिचे युट्यूबवर सुमारे 3.77 लाख सब्स्क्राइबर्स असून इंस्टाग्रामवर 1.31 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या अनेक व्हिडिओंमध्ये पाकिस्तानातील ठिकाणे, भारत-पाक क्रिकेट सामन्यांवरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तसेच काश्मीर दौऱ्यातील लष्करी ठिकाणांचे चित्रण केले आहे.

भारतातील संवेदनशील माहिती पुरवली

एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे, की ज्योतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतातील संवेदनशील माहिती पुरवली आहे. २०२३ मध्ये तिने पाकिस्तानचा व्हिसा घेण्यासाठी इस्लामाबाद येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली. तिथे तिला अहसान उर रहीम उर्फ दानिश याची ओळख झाली. नंतर ती दोन वेळा पाकिस्तानात गेली आणि तिथे गुप्तहेर अली अहवान, राणा शाहबाज आणि शाकीर यांना भेटली.

भारतात परतल्यावर ती या लोकांशी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम व स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्कात राहिली व देशविरोधी माहिती पाठवत राहिली.

सरकारने अहसान उर रहीम याला ‘अस्वीकार्य व्यक्ती’ (persona non grata) म्हणून घोषित करून हद्दपार केले आहे. ज्योती मल्होत्रालाही ‘अयोग्य व्यक्ती’ म्हणून घोषित करण्यात आले असून, तिच्यावर गुप्तचर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयए तिच्या डिजिटल साधनांची आणि सोशल मीडिया तपासणी करत आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सच्या जबाबदाऱ्या आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील तपासात आणखी काही प्रभावकांचेही नाव समोर येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in