सुभाष चंद्रा यांच्यावर CBI चा गुन्हा दाखल

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची १,३२२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध माध्यम व्यावसायिक सुभाष चंद्रा आणि इतर संस्थांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सुभाष चंद्रा यांच्यावर CBI चा गुन्हा दाखल
सुभाष चंद्रा यांच्यावर CBI चा गुन्हा दाखलसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची १,३२२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध माध्यम व्यावसायिक सुभाष चंद्रा आणि इतर संस्थांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

स्वतःची संपत्ती फुगवून दाखवणारी खोटी प्रमाणपत्रे सादर करून १,००० कोटी रुपयांच्या जवळ जाणारे कर्ज पदरात पाडून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी हाऊसिंग फायनान्सने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंद्रा यांनी सादर केलेल्या नेट वर्थ प्रमाणपत्रांच्या आधारे दोन वेगवेगळ्या कर्जाना (एकूण ९८० कोटी रुपये) मंजुरी देण्यात आली आणि ती रक्कम वितरित करण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in