SIR ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ नोव्हेंबरला सुनावणी

देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्विलोकन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ११ नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.
SIR ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ नोव्हेंबरला सुनावणी
Published on

नवी दिल्ली : देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्विलोकन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ११ नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या खंडपीठाने सांगितले की, ११ नोव्हेंबरपासून या याचिकांची सुनावणी सुरू केली जाईल. यावेळी स्वयंसेवी संस्था ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) यांचे वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले की, हा मुद्दा लोकशाहीच्या मुळाशी संबंधित आहे.

खंडपीठाने नमूद केले की, ११ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी निश्चित आहे, तरीही ‘एसआयआर’ प्रकरणांसाठी इतर काही प्रकरणांची वेळ समायोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. भूषण यांनी सांगितले की, या प्रकरणाची तत्काळ सुनावणी व्हावी. कारण विविध राज्यांमध्ये एसआयआर सुरू झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in