मुलांना विष देऊन संपवलं, स्वतः गळफास घेतला; पत्नी बाहेर जाताच क्रीडा शिक्षकाचं टोकाचं पाऊल

गुजरातच्या सूरत शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील दिंडोली परिसरात राहणाऱ्या एका खासगी शाळेतील पीटी शिक्षकाने आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे प्रचंड मानसिक तणावात येऊन दोन निष्पाप मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली.
मुलांना विष देऊन संपवलं, स्वतः गळफास घेतला; पत्नी बाहेर जाताच क्रीडा शिक्षकाचं टोकाचं पाऊल
Published on

गुजरातच्या सूरत शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील दिंडोली परिसरात राहणाऱ्या एका खासगी शाळेतील पीटी शिक्षकाने आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे प्रचंड मानसिक तणावात येऊन दोन निष्पाप मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली.

आत्महत्या शिक्षकाचे नाव अल्पेशभाई सोलंकी (वय ४१) असे असून, ते सूरतमधील एका खासगी शाळेत पीटी शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी जिल्हा पंचायत कार्यालयात नोकरी करते. दोघांची नोकरी स्थिर असूनही वैवाहिक आयुष्यात आलेल्या विश्वासघातामुळे त्यांच्या कुटुंबात मोठा कलह निर्माण झाला होता.

घटना कशी उघडकीस आली?

घटनेच्या दिवशी अल्पेशभाई यांची पत्नी त्यांना फोन करत होती, मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ती थेट घरी पोहोचली. घराचा दरवाजा आतून बंद होता. नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला आणि त्यानंतर समोर आलेले दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. बेडवर दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले, तर बाजूलाच अल्पेशभाई यांनी गळफास घेतल्याचे आढळले.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती

सूरतचे पोलीस उपायुक्त विजयसिंह गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पेशभाई यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट आणि डायरी लिहिली होती. मोबाईलमध्येही त्यांनी काही व्हिडीओ चित्रीत केले होते. पोलिसांनी हे सर्व पुरावे ताब्यात घेतले आहेत.

पत्नीसह प्रियकर अटकेत

अल्पेशभाई यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल करताना म्हटले की, "माझ्या भावाच्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत विवाहबाह्य संबंध होते, यामुळेच भाऊ तणावात होता आणि शेवटी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले." तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अल्पेशभाई यांच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in